जिद्द यालाच म्हणतात! पेन विकून खर्च भागवला, दुकानात काम करून उभी केली कोट्यवधींची कंपनी
Authored Byप्रियांका वर्तक | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 Oct 2023, 5:39 pm
Subscribe
Inverter Man Of India: तुमचा जन्म कोणत्या कुटुंबात झाला आहे हे तुमच्या हातात नाही, पण तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे. जगभर अनेक लोक अडचणींना धैर्याने सामोरे जातात आणि मोठे यश मिळवतात. एक वेळ होती जेव्हा कुंवर यांनी पेन विकून अभ्यासाचा खर्च भागवला, पण आज तो करोडोंच्या कंपनीचा मालक आहे.
हायलाइट्स:
सुकाम कंपनीचे संस्थापक कुंवर सचदेव एकेकाळी पेन विकायचे
कुंवर यांनी नोकरी सोडून नंतर व्यवसाय सुरू केला.
आपल्या मेहनतीच्या जोरावर करोडोंची कंपनी उभी केली
महाराष्ट्र टाइम्स.कॉमनवी दिल्ली : आयुष्यात कितीही अडचणी, अडथळे असले तरी मेहनत आणि कठोर परिश्रम झोकून प्रयत्न केले तर मोठे यश मिळवता येते. आयुष्यात जेव्हा समस्या उद्भवतात तेव्हा बहुतेक लोक लवकर घाबरतात आणि माघार घेतात. परंतु असेही लोक आहेत जे मोठ्या धैर्याने अडचणींनाही सामोरे जातात आणि यश मिळवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जी एकेकाळी बसमध्ये आणि घरोघरी जाऊन पेन विकायची, पण आज हजारो कोटींच्या कंपनीची मालक आहे.आज आपण जगभर इन्व्हर्टर मॅन म्हणून प्रसिद्ध सुकाम कंपनीचे संस्थापक कुंवर सचदेव यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यांच्या कंपनीच्या सोलर उत्पादनांची मागणी केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहे.
लॉकडाऊनमुळे आयुष्य बदलले… घरच्या घरी सॉस बनवून आई-मुलींनी कमालच केली! वर्षाला कोटीत उलाढालपेन विकून अभ्यासाचा खर्च पूर्ण केला
कुंवर सचदेव यांचे वडील रेल्वेत लिपिक (क्लार्क) होते. कुंवर सचदेव यांनी प्राथमिक शाळेपर्यंतचे शिक्षण खासगी शाळेत केले, मात्र पैशाअभावी त्यांना पुढील शिक्षण सरकारी शाळेत पूर्ण करावे लागले. लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सचदेवने बारावीत वैद्यकीय प्रवेश घेतला, मात्र बारावीत ५०% ही गुण मिळवता आले नाहीत. त्यांनी हार मानली नाही अंडी पुढच्या वर्षी पुन्हा बारावीच्या परीक्षेला बसले, पण यावेळी ते वैद्यकीय प्रवेश परीक्षा पास करू शकले नाहीत. डॉक्टर होण्याचे स्वप्न सोडून त्याने पदवीचे शिक्षण घेतले. शिक्षणादरम्यान ते घरोघरी जाऊन आणि बसमध्ये पेन विकायचे जेणेकरून शिक्षणाचा खर्च भागवता येईल. तिथून त्यांना काही मानधन म्हणून थोडेफार पैसे मिळायला लागले त्यांच्याद्वारे त्यांनी अभ्यासाचा आर्थिक
नोकरी दरम्यान सुचली कल्पनाशिक्षण पूर्ण केल्यानंतर कुंवर एका केबल कम्युनिकेशन कंपनीच्या मार्केटिंग विभागात रुजू झाले. नोकरी करताना त्यांच्या लक्षात आले की भारतात केबल व्यवसाय खूप फायदेशीर ठरू शकतो. त्यानंतर कुंवर सचदेव यांनी नोकरी सोडली आणि सुकाम कम्युनिकेशन सिस्टम्स नावाचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. फक्त त्याचं टीव्ही केबलचं काम चांगलं चालू झालं. यासोबतच त्यांनी इतर उपकरणेही बनवण्यास सुरुवात केली.
अमेरिकेतील नोकरी सोडली, टॅक्स रिफंडमधून IT कंपनी उभारत बनले करोडपती, पाहा अब्जाधीश मराठी माणसाची Success Storyइन्व्हर्टर बनवण्याची आयडिया
कुंवर सचदेव यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घरात इन्व्हर्टर होता जो सतत खराब व्हायचा. एकदा त्यांनी इन्व्हर्टर स्वतः उघडला, तेव्हा त्यांना समजले की ही समस्या निकृष्ट दर्जाच्या सामग्रीमुळे आहे. यानंतर त्यांनी स्वतः इन्व्हर्टर बनवण्याचा विचार केला आणि १९९८ मध्ये त्यांनी सुकाम पॉवर सिस्टम नावाची कंपनी स्थापन केली आणि इन्व्हर्टर बनवण्यास सुरुवात केली. आता कुंवर सचदेव यांची कंपनी अनेक सोलर उत्पादने बनवते ज्याची मागणी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहे.
Disclaimer
Mr. Kunwer Sachdev, the original founder and visionary behind Su-Kam, is no longer associated with Su-Kam Power Systems Ltd. He has not been involved in the management, operations, or decision-making of the company for several years.Any products, services, communications, or representations made under the Su-Kam name have no connection to Mr. Kunwer Sachdev. His current efforts are entirely focused on new innovations and ventures under different entities, including his latest initiative, Su-vastika, which is redefining the energy storage and power backup industry.